‘द हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकाचे विमोचन


जळगाव (मंगळवार, 14 जुलै 2026) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हैदराबाद मुक्ती लढ्यावर आधारित लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा सांगून, राष्ट्रास एकतेचे बळ देणारे ‘द हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकाचे विमोचन जळगावचे माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील आणि भाजपाच्या तरुण तडफदार नेत्या डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

या ऐतिहासिक पुस्तकाचे लिखाण इतिहास अभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी केले आहे. यामागे त्यांचा जवळपास पंधरा वर्षाचा अभ्यास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जी संस्थाने खालसा करून सरदार वल्लभाई पटेल यांनी आपल्या दमदार कार्य कर्तुत्वाची झलक दाखवत, स्वतंत्र इस्लामिक राष्ट्राची किंवा मध्य पाकिस्तानाची स्वप्ने पाहणार्‍या हैदराबाद स्टेट च्या निजामास स्वतंत्र भारतात कसे विलीन केले..? त्यावेळी भारताची राजकीय परिस्थिती कशी होती.? हैदराबाद स्टेट हे मराठी, तेलगू आणि कन्नड अशा तीन भाषेने समाविष्ट होते.

यावेळी भाषेनुसार विभागणी करून मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी हैदराबाद स्टेट ची परिस्थिती कशी होती ? रझाकार या संघटनेने हिंदू रयतेवर केलेले अत्याचार,हिंसा, धर्मांतरण, निजाम सरकारचे अन्यायकारक कायदे या सर्व अत्याचाराच्या विरोधात हिंदू रयतेने रझाकार आणि निजाम सरकार विरोधात पुकारलेले बंड या आणि अशा अनेक रोचक घटना लेखक भारत वाळके यांनी या पुस्तकात समाविष्ट करून तत्कालीन भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तुत्वाचा आणि दूरदृष्टीचा माहितीपूर्ण आढावा घेतला आहे. या ऐतिहासिक पुस्तकात ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश देऊन समाजात इतिहासाविषयी जागृती व्हावी ही कळकळ व्यक्त केली आहे.

आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जावा आणि त्याची प्रेरणाही सर्व समाजाला मिळावी त्यामुळे प्रत्येक राष्ट्रभक्त ने हे पुस्तक वाचून आपल्या इतिहासाचा स्वाभिमान बाळगावा,
असे मत युवा नेत्या डॉ.केतकी पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी राकेश वाघ,संकेत शंकपाल, गौरी जोशी, मनीषा खरात, अक्षता शंभरकर, पूजा गांजरे, प्राजक्ता बिडकर ,नूतन भाले आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !