\

शिक्षण वाचवा, राष्ट्र वाचवा : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चाळीसगाव तालुक्यातील क्रास्टाईब संघटनेचा पाठिंबा


चाळीसगाव (गुरुवार, 23 जुलै 2026) : देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित राहावे, यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.

पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध
राष्ट्रहित आणि शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांसाठी सुरू असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, हीच आमची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अश्रूधुराचा वापर आणि लाठीचार्जचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीत नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी करणार्‍या आणि आंदोलकांवर दडपशाही करणार्‍या संबंधित दोषी पोलीस अधिकार्‍यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे, या प्रमुख मागणीचे निवेदन बुधवारी पंतप्रधान महोदयांना पाठविण्यात आले.

यांची होती उपस्थिती
हे निवेदन चाळीसगाव प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देतांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रभाकर पारवे, तालुकाध्यक्ष नितीन मोरे, तालुकाध्यक्ष महेंद्रसिंग शिसोदे, संजय साठे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष सचिन अहिरराव, जिल्हा उपाध्यक्ष गजानन मोरे, उपाध्यक्ष प्रदीप वाघ, श्रीकृष्ण अहिरे, दाभाडे, विरेंद्र पाटील, रवींद्र पाटील, विजय कदम, निलेश पाटील, परदेशी, संजय वाघ उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !