25 हजारांचा कर्ज वाटप घोटाळा : अजित पवारांसह 50 जणांविरुद्ध गुन्हा


मुंबई : 25 हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते – पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 2500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी येत्या पाच दिवसांत बँकेचे तत्कालीन संचालक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, दिलीपराव देशमुख, पांडुरंग फुंडकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह 76 संचालकांवर गुन्हा नोंदवा, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) मागील गुरुवारी दिले. या 76 जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना आज अजित पवारांसह बड्या नेत्यांविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या बँक घोटाळ्यात सकृतदर्शनी या सर्वांविरोधात ‘विश्वसनीय पुरावे’ आहेत, असे मत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.


कॉपी करू नका.