अहमदाबाद-प्रयागराज एक्सप्रेस सुधारित संरचनेसह कायमस्वरूपी धावणार


भुसावळ (मंगळवार, 31 ऑगस्ट 2026) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी अहमदाबाद-प्रयागराज एक्सप्रेस गाडी सुधारित डब्यांच्या संरचनेसह कायमस्वरूपी चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 22967 अहमदाबाद-प्रयागराज एक्सप्रेस गुरुवार, 3 सप्टेंबर 2026 पासून सुधारित संरचनेसह अहमदाबाद येथून सुटेल. गाडी क्रमांक 22968 प्रयागराज-अहमदाबाद एक्सप्रेस शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026 पासून सुधारित संरचनेसह प्रयागराज येथून सुटेल. या गाडीला तीन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सात वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान श्रेणी, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !