रावेर तालुक्याला बसला भूकंपाचा धक्का


रावेर (मंगळवार, 1 ऑगट 2026) : रावेर तालुक्यातील मोहगण-अहिरवाडीसह परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू गंगापुरी धरणाजवळ जमिनीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितकिंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी वेळेस अचानक जमिनीला हादरा जाणवल्याने मोहगण, अहिरवाडीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. र

नायब तहसीलदार संजय तायडे यांनी भूकंप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाची तीव्रता कमी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणार्‍या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !