यावल शहरात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवानिमित्त रक्तदान शिबिर


यावल (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : यावल शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात सोमवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 35 दात्यांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
शेतकी संघात डॉ.तुषार सोनवणे यांच्या हॉस्पिटलला लागून रक्तदान शिबिर झाले. शिबिरात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष मो. हकीम मो.याकुब, नगरसेवक अतुल पाटील, पराग सराफ, उमर कच्छी, अमोल भिरूड, समीर खान, महिला तालुका अध्यक्ष कल्पना तायडे सह आदींची उपस्थिती होती.


सकाळी 10 ते दुपारी दोन या वेळेत सदर रक्तदान शिबिर झाले. यशस्वीतेसाठी गणेश गुरव, युवराज भंगाळे, राजू आस्वार, शरद पाटील, शेख नईम, गिरीश देशमुख, सरफराज पिंजारी, किरण तडवी, जगदिश डोळे आदींनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !