कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : रावेर पोलिसांकडून आठ गुरांची सुटका

तीन वाहनांमधून विना परवाना गुरांची वाहतूक तिघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल


रावेर (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : कत्तलीच्या उद्देशाने विनापरवाना गुरांची वाहतूक करणार्‍या तीन वाहनांवर रावेर पोलिसांनी धडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले. या कारवाईने अवैधरित्या गुरे वाहतुकीचा प्रश्न पुन्ह समोर आला असून आठ गुरांची पोलिसांनी सुटका केली आहे. शहरातील सुभाष पेट्रोल पंप परिसरात ही कारवाई करण्यात आली.

अवैधरित्या गुरांची वाहतूक
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील सुभाष पेट्रोल पंपाजवळ छोटा हत्ती वाहन (क्रमांक एम.एच.20 बी.टी. 3372) मधून गुरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करीत वाहन ताब्यात घेतले व त्यातील 40 हजार रुपये किंमतीचे बैल आणि सुमारे एक लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकारोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून शेख शोएब शेख शरीफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


दुसरी कारवाई याच परिसरात करण्यात आली. एम.एच.02 सी.एक्स.4101 क्रमांकाच्या वाहनातून गुरांची वाहतूक होत असताना सुमारे 75 हजार रुपये किंमतीची चार गुरे आणि अंदाजे एक लाख 75 हजार रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून मोहसीन खान अयुब खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसर्‍या कारवाईत वाहन (क्रमांक एम.एच.02 ई.आर.6929) वाहनातूनही पोलिसांनी कारवाई करून दोन गुरांची सुटका केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून शेख कुर्बान शेख रईस (मदिना कॉलनी, रावेर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !