मैदान गाजवणार्या खेळाडूंचा भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयातर्फे गौरव
भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव, क्रीडा भारती भुसावळ व शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 वर्षाखालील मैदानी क्रीडा स्पर्धा भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये झाल्या.
त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांचा महाविद्यालय प्रशासनाने गौरव केला.
महाविद्यालयाचा वाढवला नावलौकीक
मैदानी क्रीडा स्पर्धेत ओम कोळी याने शंभर मीटर धावण्यात प्रथम तर दोनशे मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. शिवाय शैलेंद्र बघेलने 800 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक तसेच वैभव कालापुरेने शंभर व दोनशे मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावला.



