नंदुरबार जि.प.चे लाचखोर उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात
85 हजारांची लाच भोवली : नंदुरबार एसीबीची धडक कारवाई
नंदुरबार : बांधकाम ठेकेदाराला मिळालेल्या बिलाच्या मोबदल्यात अडीच टक्के लाच मागणार्या जिल्हा परीषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी बबन काशीराम जगदाळे (56, रा.नवापूर) यांना 85 हजारांची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आली.
लाच घेताना अटक
मूळ तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून जिल्हा परीषद नंदुरबार अंतर्गत मौजे पिंपरी पाडा येथे रस्ता दुरूस्तीचे काम तसेच नंदुरबार पंचायत समितीतील दुरुस्तीचे कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. या सर्व कामांचे एकूण बिल त्यांना 44 लाख रुपये मिळाले आहेत. 44 लाखांच्या कामाच्या मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे 2.5 टक्के लाच मागितली व त्याप्रमाणे हिशोब करून एक लाख पाच हजारांची लाच नक्की करून मागणी केली. त्यातील 20 हजारांची रक्कम दोन दिवसांपूर्वी घेतली होती तर उर्वरीत
85 हजारांची रक्कम कार्यालयात लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले.





