जामनेर तालुक्यात भीषण अपघात : एकाच कुटूंबातील सहा जण ठार

तीन महिन्यांच्या बाळासह दोन चिमुकल्यांचाही मृतांमध्ये समावेश


जामनेर (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. हा भीषण व मन हेलावणारा अपघात जामनेर-बोदवड मार्गावरील मालदाभाडी गावाजवळ गुरुवार, 15 रोजी घडला. अपघातात तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मालदाभाडी गावाजवळ काळाचा घाला
जामनेर-बोदवड मार्गावरून दुचाकीने प्रवास सुरू असताना मालदाभाडी गावाजवळ हा अपघात झाला. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात सहाही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली. दुर्घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी गर्दी झाली. एका क्षणात संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.






तीन महिन्यांच्या बाळासह दोन लहान मुलांचा मृत्यू
मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. त्याचबरोबर दोन लहान मुलांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. दोन पुरुष आणि एका महिलेचाही मृतांमध्ये समावेश झाला. लहान मुलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे मात्र मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

पोलिसांकडून घटनास्थळी तपास
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले. अपघातातील मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी जामनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे तसेच अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. ट्रकची दुचाकीला धडक कशी बसली, वाहनांचा वेग किती होता आणि अपघातामागे कोणते कारण होते, याचा तपास केला जात आहे. तपासानंतरच दुर्घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !