शहादा पंचायत समितीचा लाचखोर सहा.अभियंता एसीबीच्या जाळ्यात


दहा हजारांची लाच भोवली : नंदुरबार एसीबीची धडक कारवाई

शहादा : पाच लाख 43 हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी दहा हजारांची लाच घेणार्‍या शहादा पंचायत समितीतील लाचखोर सहाय्यक अभियंत्यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी कार्यालयातच लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. ईश्वर सखाराम पटेल (54) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लाच स्वीकारताच केली अटक
नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदाराने होळ गुजरी ग्रुप ग्रामपंचायत टेम्बली, ता.शहादा ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत गावातील पेसा अंतर्गत मुतारी बांधकाम तसेच होळ येथे पाण्याच्या हौदाचे काम पूर्ण केले होते तर मंजूर झालेल्या सहा लाख 43 हजारांच्या बिलातील एक लाख शासनाकडून अ‍ॅडव्हान्स मिळाल्यानंतर उर्वरीत रक्कम बाकी असल्याने कामाच्या बिलाच्या फाईलवर आरोपी लोकसेवकाची स्वाक्षरी बाकी असल्याने तक्रारदाराने ईश्वर सखाराम पटेल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्वाक्षरीसाठी दहा हजारांची मागणी 8 जून रोजी केली होती. लाचेची पडताळणी झाल्यानंतर बुधवार, 17 रोजी आरोपीला पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागात लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.






यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे अमोल मराठे, ज्योती पाटील आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !