जळगावच्या शनीपेठ ठाण्यातील पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल बंदोबस्ताकामी नियंत्रण कक्षात !
जळगाव (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांची बंदोबस्ताकामी जळगाव पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास यासंदर्भातील आदेश जिल्ह पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले आहेत. शनीपेठचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात सागर शिंपी यांच्याकडे असणार आहे.
वर्षभरापूर्वी पोलीस ठाण्यात नियुक्ती
रावेरसारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यात अत्यंत उत्कृष्ट सेवा बजावून जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात डॉ.विशाल जायस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. वर्षभरापासून कार्यरत डॉ.जायस्वाल यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्यासोबत अनेक गुन्ह्यांची उकलही केली मात्र अचानक त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.

बंदोबस्ताकामी नियंत्रण कक्षात
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, डॉ.जायस्वाल यांना आगामी आदेश येईपर्यंत नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्याकामी ही नियुक्ती असेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. अचानक झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तात्पुरत्या स्वरूपात सागर शिंपी यांच्याकडे शनीपेठ ठाण्याचा पदभार असणार आहे.
