यावलला उत्साहात पार पडली आंतरशालेय रोबोटिक्स स्पर्धा
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण : गॅलेक्सी कॉम्प्युटर अॅण्ड रोबोटिक्स इन्स्टिट्यूटतर्फे आयोजन
यावल (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : यावल शहरात आंतरशालेय रोबोटिक्स स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत शहर व तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. गॅलेक्सी कॉम्प्युटर अॅण्ड रोबोटिक्स इन्स्टिट्यूट यावलच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यांनी मिळवले यश
यावल शहरातील सुमाई मंगल कार्यालयामध्ये आंतर शालेय रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील गॅलेक्सी कॉम्प्युटर अॅण्ड रोबोटिक्स इन्स्टिट्यूटच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये शहर आणि तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इन्स्टिट्यूटचे स्वप्निल बोरसे, चंदन देशमुख, वर्षा पवार यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील, नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता नंदा महाजन, नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक उमेश फेगडेसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.








या स्पर्धेमध्ये सायबर सेक्युरिटी प्रकल्पात प्रथम क्रमांक यावल येथील जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आदित्य ईश्वर बारी, व्दितीय बक्षीस सेट अॅलॉयसीसचा विद्यार्थी धनंकुश कुरकूरे यात तर तृतीय बक्षीस सरस्वती विद्या मंदिर, यावलचा विद्यार्थी मनीष अशोक पाटील याने पटकावले. रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये पहिले बक्षीस मुलींचे विकास विद्यालय यावल, व्दितीय बक्षीस डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल इन ज्युनिअर कॉलेज यावल, तृतीय बक्षीस अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, साकळी यांनी चौथे बक्षी शारदा विद्या मंदिर, साकळी यांनी तर पाचवे बक्षीस साने गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाने पटकावले. त्याचप्रमाणे ए.आय.मास्टर क्लास स्पर्धेत प्रथम क्रमांक यावलच्या बाल संस्कार शाळेची विद्यार्थीनी पुर्वा दिलीप पवार हिने, व्दितीय पी.के.कोटेचा महिला महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रगती प्रवीण वाणी, तृतीय डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल यावलची मिसबाह सदफ शेख इम्रान हिने, चौथे जे.टी.महाजन स्कुल यावलची विद्यार्थीनी हेमांशी मनोज पाटील हिने तर पाचवे बक्षीस एकरा कॉलेज जळगावची विद्यार्थिनी सुमय्या हसन तडवी हिने पटकावले.