मलेशियात पुण्याच्या आरती बोरोले यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

‘मिसेस गैया वर्ल्ड 2026’ स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद


सावदा (मंगळवार, 10 नोव्हेंबर 20526) : पुण्याच्या आरती बोरोले यांनी मलेशिया येथे 4 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ‘मिसेस गैया वर्ल्ड 2026’ सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत प्रथम उपविजेतेपद पटकावले. यासोबतच त्यांनी ‘बेस्ट कॅटवॉक’ हा विशेष पुरस्कारही मिळवला. या यशाबद्दल त्यांना मानाचा मुकुट आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

1 ते 4 दरम्यान स्पर्धा
आरती यांनी 31 ऑक्टोबर रोजी मलेशियासाठी प्रयाण केले होते. 1 ते 4 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत टॅलेंट राऊंड, वैयक्तिक मुलाखत, परिचय, कॅटवॉक तसेच प्रश्नोत्तर अशा विविध फेर्‍यांचा समावेश होता. 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी हे यश संपादन केले.








भारताच्या विवाहित महिलांच्या गटातून त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारतातील ‘दिवा पेजंट्स’ या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या संपूर्ण प्रवासात दिवा पेजंट्सच्या संस्थापिका व मार्गदर्शक अंजना मस्कारेन्हास आणि त्यांच्या टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाचे संपूर्ण श्रेय आरती यांनी आपल्या कुटुंबाला, विशेषतः पती तुषार बोरोले यांना दिले. संपूर्ण प्रवासात पतीने दिलेली साथ, प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळेच हे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

आरती या जळगाव येथील अशोक चौधरी यांच्या कन्या असून, चिनावल येथील जे. व्ही. बोरोले यांच्या सून आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे पुण्यासह जळगाव आणि चिनावल परिसरातही आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारताचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !