भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांना भूकंपांचे सौम्य धक्के : नागरिक आले घराबाहेर !
गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांना शनिवारी सकाळी 9.11 ते 9.16 वाजेच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. सुरूवातीच्या काही सेकंदाला जाणवलेल्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले होते मात्र कुठलेही नुकसान वा जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह यावल, रावेर, सावदा व जामनेर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातील धामनोदजवळ आहे.
सकाळी जाणवला भूकंपाचा धक्का
भुसावळ शहरात 9.15 वाजेच्या सुमारास नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला. काही भागात नागरिकांना अगदी रेल्वेत बसल्यागत भास झाला तर अनेक ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर काही भागातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती मात्र भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कुठलंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
जीवितहानी किंवा मोठं नुकसान नाही
या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुठलंही नुकसान झाल्याचंही समोर आलेलं नाही. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. प्रशासनाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.
रावेर तालुक्यातही जाणवला धक्का
रावेर शहरात व परिसरातील काही भागातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
मध्यप्रदेश केंद्रबिंदू
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्ला भूकंप 4.5 तीव्रतेचा असून त्याचे धक्के खरगोन, धामनोद (धार, मध्य प्रदेश, भारत) च्या 69 किमी दक्षिणेस, शनिवार, 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मध्य प्रदेशातील धामनोदपासून 69 किमी (43 मैल) अंतरावर 4.5 तीव्रतेचा मध्यम स्वरूपाचा भूकंप झाला. भूकंपाची खोली निश्चित करता आली नाही, परंतु ती उथळ असावी असा अंदाज आहे. या भूकंपाचे धक्के परिसरात अनेकांना जाणवले. भूकंप उथळ असल्यामुळे, समान तीव्रतेच्या अधिक खोलवर होणार्या भूकंपाच्या तुलनेत, केंद्रबिंदूच्या जवळ तो अधिक तीव्रतेने जाणवला.
अनेक भागांना जाणवले धक्के
सूत्रांनुसार केंद्रबिंदूपासून 25 किमी अंतरावर असलेले सांगवी , 27 किमी अंतरावर असलेले खरगोन, 46 किमी अंतरावर असलेले चोपडा, 48 किमी अंतरावर असलेले सेंधवा, 49 किमी अंतरावर असलेले यावल, 77 किमी अंतरावर असलेले बुरहानपूर आणि 87 किमी अंतरावर असलेले खंडवा या भागांत सौम्य धक्के जाणवल्याचे समजते.