बामणोद गावात पिठाच्या गिरणीला आग : 64 हजारांचे साहित्य खाक


यावल (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील बामणोद या गावात एकविरा पिठाची गिरणीला अचानक आग लागली. या आगीत गिरणीतील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामध्ये 64 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

64 हजारांचे नुकसान
बामणोद गावातील संतोष नामदेव सोनवणे यांची एकविरा पिठाची गिरणीत दळण्यासाठी आलेल्या धान्यासह, पिठाचे पोते, हळद व मिरची तसेच इतर साहित्य ठेवलेले होते. या गिरणीला अचानक आग लागली या आगीत पिठाचे पोते, मिरची हळद व इतर साहित्य जळून खाक झाले यामध्ये त्यांची 64 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात संतोष सोनवणे यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास नागेंद्र तायडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !