धुळे नूतन अपर पोलिस अधीक्षकपदी प्रशांत बच्छाव तर जळगावात चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती


अमळनेर सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी कुमार चिंथा : राज्यातील पोलिस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या

जळगाव : राज्यातील पोलिस अधीक्षक/पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री उशिरा राज्याचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी जारी केले आहेत. त्यात जळगावच्या अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नंदुरबार येथील अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत वामन गवळी यांची बदली करण्यात आली तर धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ यांची अमरावती नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धुळे पोलिस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जगन्नाथ बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेर सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी कुमार चिंथा यांची बदली करण्यात आली आहे.

भुसावळ उपअधीक्षक गजानन राठोड यांची बदली
भुसावळातील पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड यांची नवी मुंबई सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.






साक्री पोलिस उपअधीक्षकपदी प्रदीप मैराळे
धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या पोलिस उपअधीक्षकपदी वर्धा, आर्वी उपविभागाचे उपअधीक्षक प्रदीप भिवसन मैराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांची नागपूर नागरी हक्क संरक्षक उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अमळनेर उपविभागाच्या उपअधीक्षकपदी मुंबई गुप्त वार्ता विभागाचे राकेश साहेबराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !