भुसावळ शहरातून दुचाकी लांबवली


भुसावळ- यशोदा नगरातील रहिवासी सतीश पंडीत सपकाळे यांनी त्याच्या घराच्या आवारात लावलेली होंडा मोटरसायकल (एम.एच.19 सी.व्ही.4897) कुणीतरी चोरट्यांनी मंगळवारी रात्री लांबवली. सतीश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात सुमारे 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार रमण सुरळकर पुढील तपास करीत आहे.


कॉपी करू नका.