जळगाव स्थानकावर फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून एक लाख 33 हजारांचा दंड वसुल


अचानक तपासणी मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ : मोहिमेत सातत्य राखण्याची मागणी

जळगाव : रेल्वेच्या विशेष तपासणी पथकाने जळगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी अचानक राबवलेल्या तिकीट तपासण मोहिमेत 270 केसेसच्या माध्यमातून एक लाख 32 हजार 790 रुपयांचा दंड वसुल केला. अचानक झालेल्या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांची घाबरगुंडी उडाली.

प्रवाशांमध्ये कारवाईने घबराट
रेल्वेचचे वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा याच्या मार्गदर्शनाखाली सहा.वाणिज्य प्रबधंक (टी.सी.) अजयकुमार यांच्या नेतृत्वात 31 तिकीट निरीक्षक व एका रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍याची मदत घेत 270 प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या माध्यमातून एक लाख 32 हजार 790 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणार्‍या 72 प्रवाशांकडून 35 हजार 400 रुपये तसेच जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणार्‍या 197 प्रवाशांकडून 95 हजार 250 रुपये दंड तसेच सामानाची बुकींगविना वाहतूक करणार्‍या एका प्रवाशांकडून एक हजार 450 रुपये दंड वसुल करण्यात आला.

यांचा मोहिमेत सहभाग
विशेष मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे एन.पी.अहिरराव, के.के.तनती, वाय.डी.पाठक, एल.आर.स्वामी, वि.के.सचान, एम.एन.चव्हाण, एम.के.राज, पी.एम.पाटील, एम.पी.नजरकर, एस.ए.दहिभाते, एस.पी.मालापुरे, वाय.आर.नावकर, एस.एन.चौधरी, ए.एस.गायकवाड, मो.रफिक, वि.पी.काळे, ए.आर.सुरवाडकर, जे.ए.पाटील, राजेंद्र प्रसाद, ए.एम.पुराणिक, पी.के.चर्तुवेदी, शेख इमरान, पी.के.सिंह व शेख जावेद सहभागी झाले.


कॉपी करू नका.