वीज बिलाबाबत उर्जा मंत्र्यांची भूमिका अयोग्य : खासदार रक्षा खडसे
तर भाजपा सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा दिलासा इशारा
मुक्ताईनगर : जेवढे बिल आलेले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकत नसले तरी, काही प्रमाणात का होईना ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी करीत उर्जा विभागाने निर्णय न बदलल्यास भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
