जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 49 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 53 हजार 891 वर : एकाच दिवसात 59 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 49 रुग्ण आढळले. त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे असून आतापर्यंत कोरोनामुळे 1284 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 53 हजार 891 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 52 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची कमी होणार्‍या रुग्ण संख्येमुळे समाधान व्यक्त होत आहे.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 15
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 11
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 03
भडगाव 02
धरणगाव 00
यावल 04
एरंडोल 01
जामनेर 03
रावेर 01
पारोळा 02
चाळीसगाव 01
मुक्ताईनगर 04
बोदवड 00
अन्य जिल्हा 01




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !