आयशरची दुचाकीला धडक : मुक्ताईनगरचा तरुण ठार
मुक्ताईनगर : भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिल्याने मुक्ताईनगराचा तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्ग 46 वर मलकापूर रस्त्यावरील पिंपरी अकराऊतजवळ ही घटना घडली. रईस खान सईद खान (मुक्ताईनगर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. आयशर (क्रमांक एम.एच.20 सी.टी.2443) ही मलकापूरकडे जात असताना व दुचाकी (एम.एच.19 के.6023) रईस खान सईद खान हा जागीच ठार झाला. या प्रकरणी शेख सकुर शेख सफी (रा.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून आयशर गाडीवरील चालक गजानन प्रभाकर पाटील (रा.हरताळा) यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

