बोदवड शहरात सीसीआयतर्फे कापूस खरेदीचा शुभारंभ


बोदवड : कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी हवालदिल झाला असताना शेतकर्‍यांसाठी सीसीआयतर्फे कापूस खरेदीला सुरूवात झाली असून प्रति क्विंटल पाच हजार 800 रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, बोदवडचे तहसीलदार हेमंतकुमार पाटील, कापूस जिनिंगचे मालक गुप्ता, कैलास खंडेलवाल, बोदवड पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, मधु राणे, रामदास पाटील, भगतसिंग पाटील, जीवन राणे ,गणेश पाटील प्रभाकर पाटील, सुधीर पाटील, विरेंद्रसिंग पाटील, कैलास सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. सीसीआय कापुस खरेदी ही विनातक्रार व शेतकर्‍यांची अडवणूक न होता योग्य पद्धतीने व्हावी, असे खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !