रावेर तालुक्यात 900 शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वर्ग


रावेर : रावेर तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात हेक्टरी 10 हजार तर बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आजपर्यंत 60 लाख रुपये अनुदान एक हजार 900 शेतकर्‍यांना वर्ग करण्यात आले आहेत. तर इतर शेतकर्‍यांना अनुदान वर्ग करण्यासाठी पुरवठा अधिकारी हर्षल पाटील वेगाने काम करत आहे. शेतकर्‍यांनी थोडा धीर धरावा लवकरच पूर्ण अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तालुक्याला सुमारे चार हजार शेतक-यांसाठी एक कोटी 13 लाख 32 हजार 588 रुपयांचा निधी तहसील कार्यालयात प्राप्त झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !