कल्याण पत्री पुलासाठी 21 व 22 रोजी मेगा व पॉवर ब्लॉक
उपनगरी गाड्या झाल्या रद्द : रेल्वे प्रवाशांची होणार मोठी गैरसोय ः कल्याण-कर्जत/कसारादरम्यान विशेष सेवा
भुसावळ : कल्याण येथील पत्री पुलासाठी मध्य रेल्वेतर्फे रुळांवर 77 मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक शनिवार, 21 व रविवार, 22 रोजी घेेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 10.15 ते दुपारी 2.15 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार असून या दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. डोंबिवली ते कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 9.50 ते दुपारी 2.15 दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
कर्जत-कसारादरम्यान विशेष सेवा
ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत व कसारा दरम्यान विशेष सेवा चालविली जाणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला/ठाणे/डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. तसेच 02168 मंडुआडीह-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 01059 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष, 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस -दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा-वसई रोड-जळगावमार्गे वळविण्यात येतील. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
या गाड्या धावणार उशिराने
02812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे), 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) आणि 04151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या वाटेमध्ये 15 ते 105 मिनिटांसाठी थांबविण्यात येतील. 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष 21 रोजी दुपारी 2.00 वाजता सुटेल आणि 01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी विशेष दि. 22.11.2020 रोजी मध्यरात्री 01.00 वाजता सुटेल.
रविवारीदेखील उपनगरी गाड्या रद्द
रविवार, 22 रोजी सकाळी 9.50 ते दुपारी 1.50 ब्लॉक घेण्यात येणार आहे तर डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 9.20 ते दुपारी 1.50 दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत/कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला/ठाणे/डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
या गाड्यांचे डायव्हर्शन
03201 पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 02187 जबलपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, 02168 मंडुआडीह-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 01055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष, 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष आणि 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस-दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा-वसई रोड- जळगावमार्गे वळविण्यात येतील. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येणार आहे.
या गाड्या धावणार उशिराने
08225 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), 01094 वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे) आणि 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) 20 मिनिट ते 105 मिनिटांसाठी थांबविण्यात येतील. 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.40 वाजता सुटेल, 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर विशेष गाडी 22 रोजी दुपारी 2.55 वाजता सुटेल आणि 02586 लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी 22 रोजी दुपारी दोन वाजता सुटणार आहे.

