भुसावळातील अपहृत तरुणी अद्यापही बेपत्ता


भुसावळ : भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 25 वर्षीय तरुणीचे जामनेर रोडवरून चारचाकीतून अपहरण करण्यात आल्याची घटना 18 जून 2020 रोजी घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या पाच महिन्यानंतरही या तरुणीचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, रीना सुरेश लोहार (25, प्रोफेसर कॉलनी, मुकेश मेडिकलजवळ, भुसावळ) ही तरुणी 18 जून 2020 रोजी सकाळी घराबाहेर भाजीपाला घेण्यासाठी दुचाकी (एम.एच.18-2229) वरून बाहेर पडल्यानंतर जामनेर रोडवरील एकवीरा किराणा दुकानासमोरून क्रेटा कंपनीच्या गाडीतून बसून निघून गेली होती. या प्रकरणी तरुणीच्या पित्याने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली होती. तरुणी शरीराने जाड, उंची पाच फूट तीन, चेहरा गोल, केस लांब व काळे, अंगात पांढर्‍या रंगाचा पंजाबी ड्रेस व पांढर्‍या रंगाची ओढणी असे वर्णन आहे. तरुणीबाबत काही माहिती असल्यास सहा.निरीक्षक अनिल मोरे (8208010128) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !