धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू


भुसावळ : कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 34 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाल्याची घटना 14 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती. मयताची अद्याप ओळख पटली नसल्याने लोहमार्ग पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. वरणगाण-मन्यारखेडा रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक 52 जवळ कुठल्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 34 वर्षीय अनोळखी जखमी झाल्यानंतर त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू होते व उपचार सुरू असताना 16 रोजी दुपारी साडेचार वाजता त्याचा मृत्यू झाला. अनोळखी मयताची उंची पाच फूट सहा इंच, रंग गोरा, नाक सरळ, मिशी जाड, दाढी ठेवलेली, अंगात शर्ट नाही तसेच फिक्कट रंगाची जीन्स पँट असे अनोळखीचे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र भास्कर साळुंके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !