सोने चोरी प्रकरणी प्रकरणी हिंगणघाट पोलिसांची भुसावळात चौकशी


भुसावळ : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सोने चोरी प्रकरणाचा तपासासाठी हिंगणघाट पोलिस बुधवारी  शहरात आले होते. हिंगणघाट येथे 40 लाख रुपयांच्या सोने चोरी प्रकरणी वर्धा येथील स्थानिक गुन्हा शाखेचे सहा.फौजदार जमुळकर व त्यांचे सहकारी यांचे पथक भुसावळात आले होते. त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट देत त्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दितील रेकॉर्डवरील गुन्हेगार, चैन स्नॅचिंग व घरफोडी करणार्‍या संशयीतांची माहिती जाणून घेतली. रमण सुरळकर, विकास सातदिवे, चेतन ढाकणे, सचीन चौधरी, योगेश माळी, हेमंत जांगळे व ईश्वर भालेराव यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !