ऑनलाईन दुचाकी विक्रीच्या जाहिरातीद्वारे भुसावळातील डॉक्टरांना 30 हजारांचा गंडा
भुसावळ : ऑनलाईन दुचाकी विक्रीची ओएलक्स या वेबसाईटवर जाहिरात टाकून भुसावळातील डॉक्टरांची दुचाकी न देता उलट धमकी देत 29 हजार 520 रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार डॉ.रश्मी कुंदन कोटेचा (सराफ बाजार, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी त्यांनी ओएलएक्स या वेबसाईटवर दुचाकी (क्रमांक एम.एच.03 डी.बी.7880) ची विक्री होत असल्याची जाहिरात पाहिल्यानंतर संबंधिताशी संपर्क साधला असता आरोपीने इंडियन आर्मी रेजिमेंट ऑफीस क्रमांक 8480502964 या क्रमांकावर फोन पे करण्यास सांगितल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या फोन पे अकाऊंटवरून 29 हजार 250 रुपयांची रक्कम वेळोवेळी टाकली मात्र आरोपीने दुचाकीने न दिल्याने तक्रारदाराने त्यांना विचारणा केली असता आरोपीने तुमने इंडियन आर्मीका पार्सल रीसीव्ह नही किया तो तुम पे कारवाई होगी, आपको जेल होगी, आपका करीयर बर्बाद होगा, असे सांगत धमकी दिली. या प्रकरणी आरोपी राजकुमार कैलास सेठ (तुंगा, आर.एम.नं.11, काझी मंजील, बुझीया जाधववाडी, एसव्हीआरडी, पवई मुंबई) व अनोळखी डिलेव्हरी बॉय (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.

