सांगोला ते शालिमार दरम्यान किसान पार्सल गाडी धावणार
भुसावळ : मध्य रेल्वेने सांगोला ते शालिमार दरम्यान विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भुसावळ विभागातून धावणार असल्याने शेतकर्यांची मोठी सोय होणार आहे.
सांगोला-शालिमार किसान पार्सल गाडी
डाऊन 00123 सांगोला ते शालिमार किसान पार्सल गाडी 21 नोव्हेंबर ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवार व शनिवारी सांगोला स्टेशन येथून 12.15 वाजता प्रस्थान केल्यानंतर बुधवार व रविवारी शालिमार स्टेशनवर दुपारी तीन वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, नागपूर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगुडा, राउलकेला, टाटानगर या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 00124 शालिमार-दौंड किसान पार्सल गाडी 23 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान दर गुरुवार व सोमवारी शलिमार स्थानकावरून रात्री 12.15 वाजता सुटल्यानंतर शुक्रवार, मंगळवारी दौंड स्टेशनला सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला अप दिशेला भुसावळ, मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
शेतकर्यांना लाभ घेण्याचे आवाहन
शेतकरी, कार्गो एग्री ग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांनी आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

