वरणगावात 24 रोजी भाजपाचे रस्ता रोको आंदोलन


25 कोटींच्या मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याची मागणी

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे भाजपा सरकारच्या कार्यकाळात 13 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या प्रयत्नातून 25 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली मात्र अद्यापही योजनेचे काम सुरू न झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपातर्फे मंगळवार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.

वरणगावकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल
तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वरणगाव शहरासाठी 25 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. योजनेचा पहिल्या टप्पाचा निधी सुद्धा खात्यात जमा झाला मात्र प्रशासन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करत नसल्याने वरणगावकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करा यासह विविध विकासकामे तत्काळ सुरू करावीत, कोरोना काळातील वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी 10 वाजता बस स्थानक चौकात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, अजय भोळे, प्रा.डॉ.जतीन मेढे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, माला मेढे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, राजेंद्र चौधरी, मनोहर सराफ, अजय पाटील, संजय जैन, शामराव धनगर, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, ज्ञानेश्वर घाटोळे, नामदेव मोरे (पहेलवान), प्रवीण ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन केले जाणार आहे.



आंदोलनात सहभागाचे आवाहन
भाजपा कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, युवा मोर्चाचे संदीप भोई, आकाश निमकर, शंकर पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश पालवे, अरुण बावणे, गोलू राणे, रामदास माळी, हितेश चौधरी, किशोर सोनार, डी.के.खाटीक, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसूफ खान, नूर खान, नटराज चौधरी, कुंदन माळी, जय चांदने, तेजस जैन, लखन माळी, नथ्थू पवार, अनिल कुसुंबे, किरण वंजारी, संदीप माळी, चेतन माळी, महेश माळी, संजय बेदरकर, कमलाकर मराठे, राहुल जंजाळे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !