अ.भा.महात्मा फुले समता परीषद पूर्व जळगाव जिल्हाध्यक्षपदी सचिन चौधरी


भुसावळ : अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद पूर्वच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन संतोष चौधरी यांची शनिवारी निवड करण्यात आली. नाशिक विभागीय अध्यक्ष बाबासाहेब कर्डीले, समता परीषदेचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शालिग्राम मालकर, सतीश पाटील, संतोष माळी यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शनिवारी सायंकाळी सहा वाजता जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिराजवळ माजी आमदार संतोष चौधरी यांनी सचिन चौधरी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर, धीरज अनिल चौधरी, विनोद चौधरी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !