सावद्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त


सावदा : सावदा येथे शनिवारी रावेर तहसीलदारांनी नेमून दिलेल्या अवैध गौण खनिज पथकाने कारवाई करीत दोन ट्रॅक्टर जप्त केले. सावदा पथक प्रमुख तथा सावदा मंडळाधिकारी बी.एम.पवार, सावदा तलाठी एस.के.पाटील, थोरगव्हाण तलाठी एम.एच.तडवी, रायपूर तलाठी श्रीहरी कांबळे, मस्कावद तलाठी ओ.एस.मटाले, उदळी तलाठी मोमीन मुबीन, वाघोदा तलाठी प्रवीण वानखेडे, सुरेश बोरनारे, पिंटू तडवी यांनी ही कारवाई केली. सावदा येथे विना क्रमांकाचे माती खरव चे दोन ट्रॅक्टर पंचनामा करून सावदा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !