यावलमध्ये 34 वर्षीय इसमाची गळफास घेत आत्महत्या
यावल : शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेल्या गजानन नारायण कोल्हे (34) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. विजय नारायण कोल्हे (रा.शिवाजी नगर, यावल) यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा मोठा भाऊ गजानन नारायण कोल्हे (34) हा त्यांच्या घराशेजारी राहतो. शनिवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास तो घरात एकटा असतांना त्याने घराच्या छतावरील लोखंडी अँगलला ओढणी बांधूण ओढणीस सुताचा दोर बांधुण गळफास घेतला. यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.

