न्हावी ते सून सावखेडा स्वामी नारायण पदयात्रेचे आयोजन
फैजपूर : यावल तालुक्यातील स्वामी नारायण देवस्थान, न्हावी ते सुना सावखेडा (प्राचीन जागृत हनुमान देवस्थान) पदयात्रा स्वामी नारायण पंथ व हनुमान भक्तांनी खान्देशरत्न भक्ती किशोरदासजी महाराजांचे नेतृत्वाखाली शनिवारी पहाटे सहा वाजता रवाना झाली. सुमारे आठ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे देशभरासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरीकांची मोठी कोंडी झालेली होती मात्र कोरोनाची मंदावलेली स्थिती बघता महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंदिरे व प्रार्थनास्थळ यावरील बंदी उठवली आहे. याचा विनाविलंब न करता न्हावी येथील स्वामी नारायण समाज बांधवांनी शास्त्री भक्ती किशोरदासजी व अन्य संतांच्या सान्निध्यात ही पदयात्रा घडवून आणली. या पदयात्रेचे सुना सावखेडा प्राचीन जागृत हनुमान देवस्थान येथे समापन करण्यात आले.
काळजी घेण्याचे आवाहन
याप्रसंगी येथे भक्ती किशोरदासजी यांनी विधीवत पूजा केली. त्यानंतर कोरोना महामारीपासून समस्त व सर्व उपस्थित भाविक नागरीकांचे रक्षण होऊन कोरोनापासून भारतासह संपूर्ण विश्वाला मुक्ती मिळण्यासाठी सामूहिक हनुमान चालिसा व रामरक्षाचे पठण व महाआरती तसेच स्वामी नारायण संकीर्तन करण्यात आले. संतांचे आशीर्वचन झालेत. यामध्ये कोरोला महाभारी अजून संपलेली नसून या बाबी सर्वांनी अधिक सजग होऊन काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित भाविकांनी सामूहिक महाप्रसादाचा आनंद घेतला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, शास्त्री धर्म प्रकाशदासजी, शास्त्री भक्तीप्रियदासजी, शास्त्री कृष्णप्रियदासजी, शास्त्री लक्ष्मीनारायणदासजी, शास्त्री नित्यप्रकाशदासजी, शास्त्रीसत्यप्रकाशदासजी, शास्त्री श्रीजीप्रियदासजी, पार्षद दीपक भगत, ज्ञानेश्वर भगत, पुष्कर भगत, हभप संजय महाराज, यासह स्वामीनारायण महिला व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन शास्त्री भक्ती किशोर दासजी यांनी केले.

