भुसावळात नगरसेवकाच्या भावाला लुटले : दोघे आरोपी जाळ्यात


भुसावळ : सीट कव्हर कुशनचे पैसे देण्यासाठी जाणार्‍या नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे बंधू अनिल ठाकूर यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील दिनदयाल नगरमधील गिरीष किराणा दुकानाच्या बाजुच्या बोळीत घडली होती. या प्रकरणी अशोक उर्फ भाचा सदाशिव कोळी (रा.दिनदयाल नगर भुसावळ) व जावेद उर्फ पोटली नवाब बागवान (रा.पंचशील नगर) यांना अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, पो.ना.किशोर महाजन, रमण सुरळकर , रविंद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव ,प्रशांत परदेशी, रवींद्र तायडे, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे यांनी कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, रविंद्र तायडे करत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !