यावल न्यायालयातील कनिष्ठ लिपिकासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा


खोट्या बिलांद्वारे 14 लाख 27 हजारांची केली शासनाची फसवणूक

यावल : यावल न्यायालयातील कनिष्ठ लिपिक या पदावर शासकीय नोकरी करीत असताना त्यांचा मुलगा अक्षय विजय सूर्यवंशी याचे डॉक्टरांकडून उपचाराचे खोटे बिले व कागदपत्रे तयार करून अनोळखी कर्मचार्‍यांच्या संगनमताने खोट्या सह्यांची व बनावट कागदपत्रे तयार करून 14 लाख 27 हजार 670 रुपयाची अप्रमाणितपणे फसवणूक केल्याप्रकरणी येथील प्रथम श्रेणी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश यांनी यावल पोलिसात तक्रार ल्यिनंतर गुन्हा दाखल केल्याने न्यायालयीन कर्मचार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कनिष्ठ लिपिकासह दोघांविरुद्ध गुन्हा
यावल दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा दंडाधिकारी यांच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पदावरील विजय पंढरीनाथ सूर्यवंशी (पुष्कराज अपार्टमेंट, सेंट अलॉयसीस हायस्कूलमागे, भुसावळ) यांनी त्यांचा मुलगा अक्षय विजय सूर्यवंशी याचे डॉक्टर अभय एन.सदरे (रूबी हॉल क्लिनिक, पुणे) यांच्याकडील वैद्यकीय औषध उपचाराचे खर्चाचे खोटे बिले व खोटी कागदपत्रे करीत कार्यालयाची व शासनाची 14 लाख 27 हजार 670 रुपयाची फसवणूक केली. या प्रकरणी यावल न्यायालयातील कनिष्ठ लिपिक विजय पंढरीनाथ सूर्यवंशी व रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथील अनोळखी इसमाविरुद्ध यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप गंगाधर जगताप यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए.आय.पठाण हे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !