वरणगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी रस्ता रोको


वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी : पथनाट्यातून सरकारच्या डोळ्यात घातले अंजन

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे 25 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होण्यासाठी भाजपा पदाधिकार्‍यांनी मंगळवारी सकाळी बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे महामार्ग काही वेळ ठप्प झाला होता. वरणगाव पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा 68/1 प्रमाणे कारवाई करीत नंतर त्यांची सुटका केले. दरम्यान, योजनेच्या कामाला तत्काळ सुरूवात करण्यासाठी विभाग संयोजक विशाल जाधव यांनी पथनाट्य सादर करून सरकारच्या डोळ्यात अंजन घातले तर पिण्याच्या पाण्यात राजकारण करु नका, तोंडाचे पाणी लांबवून महापाप करू नका, असे सांगत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी योजनेचे काम सुरू होण्यासाठी यापुढे जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

रस्ता रोकोमुळे महामार्ग ठप्प
वरणगाव शहरासाठी भाजप सरकारच्या काळात माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 13 सप्टेंबर 2019 रोजी नागरीकांना 24 तास पिण्याचे पाणी मिळेल यासाठीची 25 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून दिलेल्या पाणीपुरवठा योजनेवर स्थगिती आणण्यात आली. 14 महिने झाले तरी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली नाही. वरणगावकरांना 7 ते 8 दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते त्यामुळे पाण्यासाठी प्रचंड हाल जनतेचे होत आहे. अनेक पाण्याच्या टाक्या पडक्या अवस्थेत आहे. मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करा व कोरोना काळातील जनतेचे वीजबिल माफ करा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरुद्ध जोरदार घोषणा बाजी करीत बसस्थानक चौकात मंगळवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेंढे, माजी प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, प्रा.डॉ.जतीन मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, संजयकुमार जैन, शामराव धनगर, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, प्रवीण ढवळे, गोलू राणे, जावेद शहा, आकाश निमकर, जय चांदणे, किरण धुदे, हाजी फहींम शेख, संदीप भोई यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलन करण्यात आले.

तर जलसमाधी आंदोलनाचा इशारा
माजी नगराध्यक्ष सुनिल काळे मंजूर 24/07 ची 25 कोटींच्या पाणी योजनेच्या कामाला सुरुवात न केल्यास जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे लोकशाहीला काळिमा फासल्याचा सारखा प्रकार विकास विरोधी आघाडीने केल्याचीही टिका केली. 25 कोटींची पाणीपुरवठा योजना भाजपा सरकारने मंजूर करून दिली. योजनेचा सव्वादोन कोटींचा निधी सुद्धा नगरपरीषदेच्या खात्यावर जमा आहे मात्र राजकीय आकसापोटी पाणी योजनेचा कामाला सुरुवात केली जात नसून पाण्यात राजकारण विकास विरोधी आघाडी सरकार करीत असून महिन्याभरात मंजूर पाणी योजनेच्या कामाला सुरुवात न झाल्यास जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे काळे यांनी मनोगतात सांगितले.

राज्य सरकार लवकरच कोसळणार : अजय भोळे
अजय भोळे यांनी राज्य सरकार लवकरच कोसळणार असून राज्यात भाजपाचे सरकार येणार असून वरणगावकरांनो चिंता करू नका, यांनी पिण्याचे पाणी येऊ दिले नाही लवकरच आपण वरणगावशहराला 24 तास पिण्याचे पाणी देऊ, असे भाजपा पदाधिकारी अजय भोळे म्हणाले. यावेळी सहा.निरीक्षक संदीप बोरसे व सहकार्‍यांनी सुमारे 30 कार्यकर्त्यांना मुंबई पोलिस कायदा 68/1 प्रमाणे कारवाई करीत ताब्यात घेतले व नंतर त्यांची सुटका केली.

शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
रस्ता रोको आंदोलनात नामदेव पहेलवान, रमेश पालवे, हितेश चौधरी, शंकर पवार, कमलाकर मराठे, संजय बेदरकर, भाऊलाल टिंटोरे, महेश माळी, मिलिंद भैसे, बंटी सोनार, अमन चंदले, चेतन माळी, तेजस, योगेश माळी, नटराज चौधरी, डी.के.खाटीक यांच्यासह 300 कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !