बिसारा सायकलपटूंचे बीआरएम 200 स्पर्धेत यशस्वी सहभाग


भुसावळ : धुळे येथे आयोजित बी.आर.एम.200 या दोनशे किलोमीटर सायकल स्पर्धेत भुसावळ स्पोर्टस् अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या गणसिंग पाटील, विलास पाटील, पंकज कुलकर्णी, विद्याधर इंगळे व डॉ.निलेश भिरुड या पाच सायकलपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.

11 तासात दोनशे किलोमीटर प्रवास
बी.आर.एम. 200 ही अतिशय महत्त्वाची व प्रतिष्ठेची स्पर्धा असून मोजकेच सायकलपटू दोनशे किलोमीटरचा अंतर तेरा तासांच्या कालमर्यादेत पूर्ण करू शकतात. भुसावळच्या पाचही धावपटूंनी हे अंतर 11 तासांच्या आत पूर्ण केले. विशेष म्हणजे पंकज कुलकर्णी यांनी केवळ सिंगल गिअरच्या सायकल वर तब्बल दोनशे किलोमीटर अंतर पूर्ण करून भुसावळकरांसाठी एक वेगळा आदर्श नोंदविला. ही स्पर्धा धुळे-मालेगाव-धुळे-शिरपूर-धुळे या मार्गावर घेण्यात येऊन चार ठिकाणी तपासणी केंद्र होते. प्रत्येक तपासणी केंद्रावर सायकलपटूची नोंद घेतली जात होती. निर्धारीत अंतर पार केल्यानंतर प्रत्येक सायकलपटूचे स्वागत आयोजकांमार्फत करण्यात येऊन मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले. या स्पर्धेत सहभागी 40 पैकी केवळ 29 स्पर्धक निर्धारीत अंतर वेळेत पूर्ण करू शकले. प्रवीण फालक, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ. तुषार पाटील, डॉ.चारुलता पाटील, पूनम भंगाळे, प्रवीण वारके, रणजीत खरारे, सचिन अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण पाटील यांनी यशस्वी सायकलपटूंचे अभिनंदन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !