भुसावळात उद्या डी.एस.ग्राऊंडच्या स्वच्छतेसाठी आंदोलन


भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आरपीडी रोडवरील प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड (डी.एस.ग्राऊंड) ची प्रचंड वाताहत झाल्याने प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंड समितीने बुधवार, 25 रोजी सकाळी 11 वाजता स्वच्छता आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कामगार नेते जगन सोनवणे व पुष्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत दहा संघटनांच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.

मैदानाची प्रचंड वाताहत
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मैदानाची आज प्रचंड दुरवस्था झाली आहे शिवाय सर्वच पाण्याचा चिखल साचला असून 6 डिसेंबर या दिवशी महामानवाचा महापरीनिर्वाण दिन असल्याने त्यापूर्वी ही स्वच्छता होणे गरजेचे असल्याने बुधवारी आंदोलन करण्यात येणार आहे. पालिकेने या मैदानाला महामानवाचे नाव दिले असल्याने दोन्ही प्रवेशद्वारावर नाम फलक लावावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे प्रवेशद्वारासमोर लावावेत व तसा ठरावही करावा, क्रिकेटप्रेमी, रनर, फुटबॉलपटू यांच्यासाठी मैदानाच्या एका बाजूला स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समिती सचिव राकेश बग्गन यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !