चुंचाळेत विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील सोनी योगेश पाटील (30) या विवाहितेने मंगळवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
चुंचाळे येथील रहिवासी योगेश अशोक पाटील यांनी यावल पोलिसात या प्रकरणी खबर दिली. मयत विवाहितेच्या पश्चात 9 व 6 वर्षीय अशी दोन मुले आहेत. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सुशील घुगे आदींनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला.

