किनगावच्या तरुणाची लेफ्टनंटपदी नियुक्ती
यावल : तालुक्यातील किनगाव येथील अरुण मुरलीधर पाटील (अरूण टेलर) व रंजना अरूण पाटील यांचा मुलगा राहुल अरूण पाटील यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. किनगाव व पंचक्रोशीतील परिसरात राहुलच्या या निवडीचे आंनद व्यक्त करण्यात येत आहे.
किनगावकरांच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
राहुल पाटील यांचे पहिली ते चौथीपर्यंत चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद मराठी शाळा, किनगाव येथे तर पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण नेहरू विद्यालय, किनगाव येथे तसेच आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण ए.टी.झांबरे विद्यालय, जळगाव येथे व अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण एस.पी.आय, औरंगाबाद येथे झाले. बारावीच्या गुणवत्तेवर गणित विषय घेऊन पदवीचे शिक्षण नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे झाले तसेच ते एन.सी.सी.कॅडेटही राहिले व त्यांना गुजरात एन.सी.सी.कॅम्पमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले तसेच पदवीचे शिक्षण घेत असतांना एन.सी.सी.ची सी.सर्ट परीक्षाही ते प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले. त्यानुसार त्यांना एस.एस.बी.साठी इलाहाबाद सेंटर देण्यात आले तर 10 जुन 2019 रोजी इलाहाबाद येथे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झाली व 20 आँक्टोबर 2019 रोजी आँफीसर्स ट्रेनिंग अॅकेडमी, चेनैई येथे प्रशिक्षणास सुरूवात झाी. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करून 21 नोव्हेंबर 2020 रोजी दिक्षांत समारोह पुर्ण करून त्यांना लेफ्टनंट या पदाचे पदक मेजर अर्जीत शहा यांनी सपत्निक समारंभात प्रदान केले. राहुल पाटील यांची नियुक्ती इंन्फट्री 1/3 गोरखा रेजिमेंट साठी नियुक्ती करण्यात आली. सामान्य कुटुंबातील राहुल पाटील यांचे आजोबा कै.माजी सैनिक मुरलीधर नंथ्थु पाटील यांनी आर्मी अटलरी सैन्यात सेवा बजावली होती व 1965 व 1971 या दोन्ही युद्धातही त्यांनी देशासाठी सेवा दिली होती व आज राहुल पाटील यांनी लेफ्टनंट पदाची सेवा स्वीकारत आपल्या परीवाराचा देशसेवेसाठीचा वारसा कायम ठेवला आहे. राहुल पाटील यांच्या या यशासाठी त्यांच्या परीवारासह नातेवाईक व किनगावकरांनी अभिनंदन केले आहे.

