रावेर पं.स.ला 15 व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त
रावेर : रावेर पंचायत समितीला पंधराव्या वित्त आयोगाचा 58 लाखांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. हा निधी पंचायत समिती सदस्याच्या शिफारशीवरुन खर्च होणार आहे.
रावेर पंचायत समितीला शेष फंड जरी शून्य आला असला तरी पंधराव्या वित्त आयोगाचा 58 लाखांचा निधी नुकताच प्राप्त झाला. हा निधी पंचायत समिती सदस्य यांच्या शिफारशीवरुन खर्च करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून पंचायत समिती सदस्याना समाधानकारक निधी नसल्याने प्रचंड नाराजी होती. मतदारसंघात निधीअभावी कामे होत नव्हती म्हणून जनतेच्या रोषाला सुध्दा अनेक वेळा पंचायत समिती सदस्यांना समोरे जावे लागत होते.

