लव जिहाद कायदा महाराष्ट्रात सुद्धा लागू करा


भुसावळचे शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : मध्यप्रदेश सरकारप्रमाणे आता उत्तर प्रदेशात सुद्धा लव्ह जिहाद विरुद्ध कायदा अंमलात आणला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्वरीत लव्ह जिहाद विरुद्धचा कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करावी व या कायद्यात एखाद्याने व्यक्ती ने विवाह करण्याच्या नावाखाली जबरदस्तीने जर एखाद्या महिला युवतीचे धर्मांतर करण्यास तिला भाग पाडले तर अशा व्यक्तीसाठी कमीत कमी 20 वर्षाची सक्तमजुरीची काळ्यापाण्याची शिक्षेची तरतुद या कायद्यात असावी, अशी मागणी राष्ट्रीय संत सुरक्षा परीषद भारत जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रधांमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियानाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

धर्मांध प्रवृत्तींना रोखण्यासाठी गरज
जावळे यांच्या निवेदनानुसार, संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी काही धर्मांधानी समाज आणि धर्म कंटक प्रवृत्तींनी, जबरदस्तीने युवती महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना वाम मार्गाला लावून मग नंतर त्यांची हत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. संबंधित व्यक्तीला देशद्रोही विघातक कार्य करणारा व जातीय तेढ निर्माण करणारा म्हणून घोषित करण्यात यावे तसेच जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह करण्यास भाग पडणार्‍या व्यक्तीला कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळू नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !