सांगवी बुद्रुक येथे भरड धान्य खरेदीचा शुभारंभ


बळीराजाच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार चौधरी

यावल : ज्या बळीराजाच्या जीवावर हा देश चालतो आहे त्या बळीराजाच्या सुखासाठी, त्यांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी अखेरपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भरडधान्य खरेदीच्या शुभारंभप्रसंगी दिली. आमदार चौधरी व आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भरडधान्य खरेदीच्या शुभारंभप्रसंगी पहिल्या पाच शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते नारळ, रूमाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी बाजार समिती सभापती तुषार (मुन्ना) पाटील, उपसभापती उन्मेष पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, नितीन चौधरी, बारसू नेहेते, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, कांचन फालक, राकेश फेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तहसीलदार महेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, जगदीश कवडीवाले, शरद कोळी, संतोष धोबी, गोपाल चौधरी, गोटू सोनवणे, काँग्रेसचे कदीर खान, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, निलेश गडे आदी उपस्थित होते.

कापूस खरेदी केंद्रासाठी पाठपुरावा
याप्रसंगी तालुक्यात पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार लता सोनवणे यांच्यासह आपण पाठपुरावा करीत असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले. प्रसंगी बाजार समिती माजी सभापती नारायण चौधरी व मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार महेश पवार यांनी प्रास्ताविक केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !