भुसावळातील पंचशील नगरवासीयांचे आरोग्य आले धोक्यात


तत्काळ समस्या न सोडवण्यास तीव्र आंदोलन : मुन्ना सोनवणे यांचा इशारा

भुसावळ : शहरातील पंचशील नगर भागात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सर्वाधिक मोठा प्रभाग असून प्रभागात गटारी तुंबल्याने डेंग्यू, टायफाईड, मलेरीया, निमोनिया आदींसारखे आजाराने नागरीक त्रस्त झाले आहेत. रोगराईला आळा घालण्यासाठी या भागात पालिका प्रशासनाने फवारणी करावी तसेच नगरपालिका दवाखान्यात औषधांचा पुरवठा करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच जळगाव कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे यांनी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !