फैजपूरात प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर रीपाइंची निदर्शने


रावेर येथे आदिवासी कुटुंब आश्‍वासनानंतरही मदतीपासून वंचित

फैजपूर : गेल्या दोन महिन्यापूर्वी रावेर येथील आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चार भावंडांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत आर्थिक मदत व घर जाहीर केले होते. मात्र अद्याप पर्यंत या कुटुंबास ठोस मदत मिळाली नसून या कुटुंबाला न्याय न मिळाल्याने याविरोधात रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आदिवासी विकास मंच त्यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर बुधवारी तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
पीडीत कुटुंबाला शासनाने 25 लाखांची मदत द्यावी, पीडीत कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीस नोकरी द्यावी, पीडीत कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शेती देण्यात यावी, घरकुलाच्या माध्यमातून निवारा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन
नायब तहसीलदार तडवी यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसात पीडीत कुटुंबाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आदिवासी विकास मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी रावेर तालुकाध्यक्ष विक्की तायडे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, आदिवसी तडवी भिल्ल एकता मंच अध्यक्ष सलीम तडवी, राज्य सदस्य नसीर तडवी, सरफराज तडवी, शंकरजी बर्डे, गोरेलाल सोलंकी, डॉ.उमरावजी वास्कले, डॉ.गणेश बिर्‍हाडे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !