भुसावळ पालिकेची 27 रोजीची सभा बेकायदेशीर
राष्ट्रवादीच्या विरोधी गटाची तक्रार : सभा रद्द करण्याची मागणी
भुसावळ : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रस्तावीत केलेले महत्वाचे विषय जाणून बूजून घेतले गेले नसल्याने बेकायदेशीर व नियमबाह्य असलेली तसेच ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणारी शुक्रवार, 27 रोजीची सर्वसाधारण सभा तातडीने रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली आहे. राष्ट्रवादीचे गटनेता तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर व सहकार्यांनी नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांची बुधवारी भेट घेवून निवेदन दिले. तसेच काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. पालिकेची सर्वसाधारण सभेचे कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सभा होत आहे. बर्याच नगरसेवकांकडे अँड्राईड मोबाईल नाही, असला तरी तांत्रिक ज्ञान नाही,. सध्या शासनाने सर्व काही अनलॉक केल्याने पालिकेनेही सर्वांना उपस्थितीत सभा घेणे गरजेचे होते, मात्र नाहक व्हिडीओ कॉन्फरन्सने सभा घेवून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच सभेतील विषय जनतेच्या हिताचे नसून ठेकेदारांच्या हिताचे आहे आदींसह अन्य मुद्दांवर आक्षेप घेत ही सभा रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सलीम नादर पिंजारी, आशिक खान शेरखान, उल्हास पगारे, राहुल बोरसे, सिकंदर खान, जाकिर सरदार, युवराज पाटील, विशाल ठोके, तम्मा पहेलवान, जीवन अहिरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

