भुसावळ विभागात संविधान प्रास्ताविकेचे वाचन
भुसावळ : भुसावळ शहर व विभागात भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
भुसावळात प्रस्तावनेचे वाचन
भुसावळ : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जळगाव जिल्हातर्फे संविधान दिनानिमित्त प्रस्तावना वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, पप्पू सुरडकर, बाळू सोनवणे, शरद सोनवणे, बंडू देशमुख, दिलीप मोरे, विश्वास खरात, शरद तायडे, प्रकाश आढळे, प्रकाश जावेद पिंजारी, वसीम शेख, भगवान निरभवणे, विवेक सोनवणे, प्रशांत दाभाडे, आकाश ढिवरे, रीतेश नाईक, प्रशांत झाल्टे, गोविंद सोनवणे, शेख बाबुशेठ, गोरख सुरवाडे, अशोक तायडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावल शहरात फलकाचे पूजन
यावल : शहरातील बुरुज चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर संविधान दिन साजरा करण्यात आला. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फलकाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात रीपइं आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अरुण गजरे, भीमराव गजरे, दिलीप गजरे, कुलदीप गजरे, विश्वास मेढे, देविदास गजरे, बबलू गजरे, मिलिंद गजरे, सागर गजरे, गजानन कोळी, युवराज भास्कर, सोहन गजरे, अरुण आनंदा गजरे, सुमित निकम, आकाश महिरे, आबा गजरे, अशोक गजरे, आनंदा गजरे, सुरेश डांबरे, पंकज हिवरे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान दिनाचा घोषणा देण्यात आल्या.
रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)
भुसावळ : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षातर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी जुन्या नगरपालिकेसमोरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुरेश जोहरे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास पारधी, संजय लोखंडे, नरेंद्र म्हस्के, चंदू तायडे, सुरेश चौधरी, उमेश पठाडे, अनिल पवार, दीपक परदेशी, नितीन साळवे, सुनील बाबूराव जोहरे, अनिल बाबूराव जोहरे, प्रतीक निकम, प्रशांत मोरे, कमलेश साळवे, चंद्रमणी सपकाळे, प्रशांत बाविस्कर आदी उपस्थित होते.

