भुसावळात शिक्षक नूतन सहकारी पतपेढीच्या सभासदांना आठ टक्के लाभांश द्या
संचालकांची मागणी : उद्या पतसंस्थेची मासिक सभा
भुसावळ : प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीची मासिक सभा 29 नोव्हेंबरला होत असून या सभेमध्ये विविध मागण्यांचे निवेदन देत हक्काचे सभासदांचे आठ टक्के लाभांश त्वरीत जाहीर करावा, अशा प्रकारची मागणी संचालक प्रदीप सोनवणे व निलेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उद्या पतसंस्थेची सभा
यावल रोडवरील प्राथमिक शिक्षकांची पतपेढी असून या पतपेढीची मासिक सभा 29 नोव्हेंबर होत आहे. या सभेत सभासदांच्या हिताच्या विविध मागण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये सन 2019-20 चा सभासदांचा भाग भांडवलावरील लाभांश 8 टक्के देण्यात यावा व याची कार्यवाही करत त्वरीत सदरचे पैसे खात्यात जमा करावे, पतपेढीची संगणक प्रक्रिया बंद पडलेली असून ती सुरू करून सभासदांना ऑनलाईन व्यवहाराची माहिती उपलब्ध करून द्यावी, कोरोनाच्या काळामध्ये सभासदांच्या नफ्यातून खरेदी केलेल्या वाफेच्या यंत्राची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, कर्मचारी प्रोफेशनल कार्यकाळ पूर्ण होत असल्याबाबत विषय चर्चेला असून सदर कर्मचार्यांना वेतन श्रेणी दिल्यास न्यायालयाचा अवमान होईल सदर निर्णय झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सभापती व मंजुरी देणार्या संचालक मंडळाची असेल, मागील सभेत मान्य हो अमान्य संदर्भातले ठराव रद्दबातल करून पुन्हा संचालकांचे अधिकार अबाधीत ठेवावे तसेच पतपेढीच्या आवारात अनधिकृत संकुल बांधकाम करण्याची जबाबदारी निश्चित करावी व पतपेढीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करावे, अशा प्रकारची मागणी सभापती यांच्याकडे संस्थेचे संचालक निलेश पाटील कैलास तायडे व प्रदीप सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लेखा परीक्षणाची मागणी
प्राथमिक शिक्षक पतपेढीत आम्ही वेळोवेळी चुकीच्या कामांना लेखी विरोध नोंदवला आहे पतपेढीच्या यस्थ यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करण्याची लेखी मागणी सुद्धा सभापती यांच्याकडे आम्ही केली आहे. पतपेढी स्वखर्चाने लेखापरीक्षण करत नसेल तर आम्ही आमच्या स्वखर्चाने लेखापरीक्षणाची करण्यास फी भरण्यास तयार आहोत यामुळेही लेखापरीक्षण झालेच पाहिजे, असे संचालक प्रदीप सोनवणे म्हणाले.

